मुंबई : राज्यातील महामार्गावर ३०० पेक्षा जास्त ठिकाणी शौचालयांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांसोबत करार करणार आहे.
राज्य महामार्गावरील ३०० पेक्षा जास्त जागा अशा आहेत की त्या ठिकाणापासून महामार्गाच्या दोन्ही दिशेला २५ ते ३० किमीपर्यात शौचायल उपलब्ध नाही.
विशेषतः महिलांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध नाहीये. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची असलेली राज्य महामार्गावरील ३०० पेक्षा जास्त ठिकाणे ही केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांना भाडे तत्वावर देणार आहे. त्या ठिकाणी संबंधित तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शौचालय सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.
संबंधित तेल कंपन्यांना त्या जागेवर पेट्रोल पंपाबरोबर रेस्टॉरंट सारख्या सुविधा सुरु करण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. सध्या राज्य महामार्गावरील पहिल्या ३७ जागा निवडण्यात आल्या असून पावसाळा संपल्यावर त्या ठिकाणी शौचालये बांधण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.