हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा, चेंबूर येथे रुळाला तडे

हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना आज सकाळी पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागला. चेंबूर येथे रुळाला तडे गेल्याने वाहतूनक ठप्प पडली होती. दरम्यान, वीस ते पंचवीस मिनिटांनी वाहतूक सुरळीत झाली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 12, 2017, 12:07 PM IST
हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा, चेंबूर येथे रुळाला तडे title=

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना आज सकाळी पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागला. चेंबूर येथे रुळाला तडे गेल्याने वाहतूनक ठप्प पडली होती. दरम्यान, वीस ते पंचवीस मिनिटांनी वाहतूक सुरळीत झाली.

ऐन गर्दीच्या वेळी चेंबूर येथे रेल्वे रूळाला तडे गेल्याने हार्बरमार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. आज सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. 

दहा ते पंधरा मिनिटे झाली तरी रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हे नसल्याने अनेक जणांनी बस आणि टॅक्सीचा पर्याय स्विकारला. पण तरीही ऑफिसाला पोहोचण्यास उशिरा झाल्याने त्यांचा लेटमार्क लागला. 

दरम्यान रेल्वेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे रूळ दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. सध्या हार्बरवरील वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे.