मायक्रोसॉफ्टचं डेटा सर्वर मुंबई आणि पुण्यात

( अमित जोशी, झी २४ तास ) क्लाउड डेटा सेवेचा सर्वर भारतात लावल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली. भारतात एकूण तीन सर्वर असून यापैकी दोन महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे इथे आहे तर तीसरा सर्वर चेन्नई इथे आहे. 

Updated: Sep 29, 2015, 10:30 PM IST
मायक्रोसॉफ्टचं डेटा सर्वर मुंबई आणि पुण्यात title=

मुंबई : ( अमित जोशी, झी २४ तास ) क्लाउड डेटा सेवेचा सर्वर भारतात लावल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली. भारतात एकूण तीन सर्वर असून यापैकी दोन महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे इथे आहे तर तीसरा सर्वर चेन्नई इथे आहे. 

राज्यात पायाभूत सुविधा चागल्या असून ग्राहक मोठ्या प्रमाणात असल्याने राज्यात क्लाउड डेटा सर्विसचे दोन सर्वर लावले असल्याचे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष भास्कर प्रामाणिक यांनी स्पष्ट केलं. 

या सर्वरमुळे मीडिया आणि इंटरटेनमेंटच्या विस्ताराला मोठी संधी मिळणार आहे. या सर्वरमध्ये ठेवली गेलेली माहिती ही संपूर्णपणे मालकाच्या हाती असणार आहे. 

सर्वर उभे करण्यासाठी राज्य सरकारने मायक्रोसॉफ्टला जाया उपलब्ध करून दिली. त्या मोबदल्यात कंपनी अमरावतीमधील मेळघाटमध्ये डिजिटल गाव उभे करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.