मुलीला मारहाण करणाऱ्या महिला पोलिस निलंबित

लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या मुलीला मारहाण करणाऱ्या दोन महिला पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. 

Updated: Sep 30, 2015, 01:29 PM IST
मुलीला मारहाण करणाऱ्या महिला पोलिस निलंबित title=

मुंबई : लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या मुलीला मारहाण करणाऱ्या दोन महिला पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. 

नंदिनीगोस्वामी ही मुलगी आपल्या आई बरोबर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गेली होती. तिने एका गेटमध्ये प्रवेश केला, तो व्हीआयपी दर्शनाच्या रांगेसाठी असल्याचं सांगण्यात आलं.

व्हीआयपी गेटमध्ये का घुसले यावरून नंदिनी आणि तिच्या आईला महिला पोलिसांनी मारहाण केली. आमची चूक होती तर आमंच्यावर कारवाई करायला हवी होती, मारहाण नको, असं नंदिनी गोस्वामीने म्हटलं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ४८ तासांच्या आत या घटनेचा अहवाल देण्याचे आदेश दिले, यानंतर आज या दोन्ही महिला पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.