www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्या टोलवरुन राज्यभर रान माजलंय, त्या टोलचं गणित नेमकं असतं तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसतो. कोणत्या आधारावर आणि किती प्रमाणात हा टोल वसूल केला जावा यासंबंधी काही नियमही आहेत.
काय आहे टोलचं गणित?
समजा, प्रकल्पाची मूळ किंमत १०० कोटी इतकी असेल तर २० वर्षांचा देखभाल खर्च साधारण ३०० कोटी समजला जातो.
म्हणजेच, हा एकूण खर्च होतो ४०० कोटी रुपये... २० वर्षांमध्ये कंपनीचा ५०० कोटींचा फायदा गृहीत धरुन ९०० कोटी रुपये वसूल होणं अपेक्षित असतं.
टोलवसुलीची मुदत ही संबंधित रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहन संख्येसह इतर निकषांवर ठरवली जाते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.