www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातील ग्रामीण वाहतूक व्यवस्था आजारी पडण्याची शक्यता आहे. कारण एसटी एक हजार कोटी रूपयांच्या तोट्याच्या खोल खड्ड्यात गेली आहे.
ग्रामीण आणि शहरी भागाची नाळ जोडून वाड्या वस्त्यांवर प्रवाशांना पोहचवणा-या एसटीनं गाव तिथे एसटी ब्रीद गेल्या अर्ध शतकाहून अधिक काळ सार्थ ठरवलंय.
अनेक अडचणींवर मात करत एसटीनं शहरापासून ग्रामीण भागातल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचवण्यात कर्तव्य अहोरात्र बजावलंय.
मात्र महाराष्ट्राची मुख्य वाहिनी असलेली ही एसटी आता तोट्याच्या खड्ड्यात रुतली आहे.
कर्मचा-यांचं वेतन, इंधन दरवाढ, प्रवाशांची दिवसेंदिवस घटत जाणा-या प्रमाणामुळं एसटीचं कंबरडं मोडलं असून तब्बल एक हजार कोटींच्या तोट्यात गेली आहे, आणि हा तोटा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
शासनानं एसटीच्या ढासळत्या स्थितीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ग्रामीण भागातल्या प्रवाशांच्या हक्काची वाहतूक व्यवस्था असलेली ही एसटी धोक्यात येणार यात शंका नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.