मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार

मुंबईत पेट्रोल-डिझलचे दर वाढण्याची चिन्हं आहेत. कारण, महापालिकेच्या आज सादर झालेल्या बजेटमध्ये कच्च्या तेलावरील जकात कर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. 

Updated: Feb 3, 2016, 04:17 PM IST
मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार title=

मुंबई : मुंबईत पेट्रोल-डिझलचे दर वाढण्याची चिन्हं आहेत. कारण, महापालिकेच्या आज सादर झालेल्या बजेटमध्ये कच्च्या तेलावरील जकात कर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. 

३ टक्क्यांवरून जकात ४.५ टक्के करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत इंधनाचे दर भडकणार, हे निश्चित आहे... 

दरम्यान, महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्याकडे आज अर्थसंकल्प सादर केला.

३७ हजार ५२ कोटींच्या या बजेटमध्ये विकास कामांसाठी १२८७४ कोटी तर आरोग्यासाठी ३६९३.२४ कोटींची तरतूद करण्यात आलीय.