'मेक इन इंडिया' कार्यक्रम गिरगाव चौपाटीवरच

मुंबईत पुढल्या आठवड्यात 'मेक इन इंडिया'चा कार्यक्रम अखेर गिरगाव चौपाटीवरच होणार आहे. मुंबई हायकोर्टानं या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. या आदेशाला स्थगिती देत सुप्रीम कोर्टानं कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवलाय. 

Updated: Feb 3, 2016, 12:26 PM IST
'मेक इन इंडिया' कार्यक्रम गिरगाव चौपाटीवरच title=

मुंबई : मुंबईत पुढल्या आठवड्यात 'मेक इन इंडिया'चा कार्यक्रम अखेर गिरगाव चौपाटीवरच होणार आहे. मुंबई हायकोर्टानं या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. या आदेशाला स्थगिती देत सुप्रीम कोर्टानं कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवलाय. 

राज्य सरकारनं या कार्यक्रमाची जय्यत तयारी केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मात्र केवळ धार्मिक कार्यक्रम आणि गणेश विसर्जनालाच चौपाटीवर परवानगी देता येऊ शकते, असं सांगत हायकोर्टानं परवानगी नाकारली होती. 

त्यावर राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिलीय. यादरम्यान, चौपाटीवर कोणतंही कायमस्वरुपी बांधकाम केलं जाणार नाही, असं आश्वासन राज्य सरकारनं कोर्टात दिलंय.