मुंबई : नवी मुंबईतून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह घोडबंदर रोडमध्ये सापडला आहे. फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सीस असं या सात वर्षांच्या मुलीचं नाव आहे. दरम्यान, ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी मावशीच्या नवऱ्याला अर्थात काकाला अटक केली.
फ्रेंनशिला हिच्या मृतदेहावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. ऐरोली सेक्टर ८ मधून सोमवारी २९ जूनला संध्याकाळी फ्रेनशिला गायब झाली होती. सोमवारी संध्याकाळी स्कूल बसमधूनं ती स्वतः राहत असलेल्या इमारतीच्या गेटपर्यंत आली होती. त्याचवेळी एका लाल रंगाच्या कारमधून तिला नेलं गेल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.
अखेर जवळपास चार दिवसांनी तिचा मृतदेह सापडला. आता पोलीस तिच्या मारेकऱ्यांचा तपास करत आहेत. दरम्यान ही हत्या कौटुंबिक वादातून झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी फ्रानशिलाच्या मावशीच्या नवऱ्याला या प्रकरणी अटक केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.