मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हटले जाणारे दया नायक यांना निलंबित करण्यात आले आहे.
दया नायक यांना वर्षभरापूर्वी नागपुरात हजर राहण्याचे आदेश दिले होते, मात्र ते नागपुरात रूजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी दया नायक यांनी २००६ मध्ये निलंबित करण्यात आले होते. यानंतर २०१२ मध्ये दया नायक यांना पुन्हा कामावर रूजू करून घेण्याचे आदेश कोर्टाने दिले.
मात्र दया नायक हे वर्षभरापासून नागपुरात कामावर रूजू न झाल्याने त्यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
दया नायक यांच्यानावावर ८० पेक्षा जास्त एन्काऊंटर असल्याचं सांगण्यात येतं.
अंडरवर्ल्डपासून नागपुरात आपल्याला धोका असल्याचं कारण यापूर्वी दया नायक यांनी सांगितलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.