मुंबई : विविध मागण्यांसाठी शिक्षकांच्या संघटनेनं पुकारलेला संप फारसा यशस्वी झाला नाही. अनेक शहरांमध्ये या संपाला अल्प प्रतिसाद मिळाल्या.
महत्त्वाच्या सर्वच शाळा सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुंबईमध्येही शाळा बंद राहतील, असा दावा संघटनांनी केला होता. मात्र मुंबईत चाचणी आणि दहावीच्या प्रिलिम एक्झाम व्यवस्थित सुरू होत्या.
पुण्यात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. मागण्या मान्य न झाल्यास २ फेब्रुवारीपासून शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नागपूरमध्येही या संपाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
शहरातल्या बहुतेक शाळा सुरू होत्या. बोर्डाची परीक्षा तोंडावर आली असताना अशा आंदोलनाची गरज आहे का असा सवाल विचारण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.