आरक्षणावर घोंगड पांघरणाऱ्या सरकारला 'धनगरांची आंदोलनाची काठी'

कृती समितीच्या नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे मुंबईसह राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, रत्नागिरी आणि वसईत आंदोलनं झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम, तर जळगावात रेल्वे रोको केला जाईल, असंही सांगण्यात येतं.

Updated: Aug 14, 2014, 09:32 PM IST
आरक्षणावर घोंगड पांघरणाऱ्या सरकारला 'धनगरांची आंदोलनाची काठी' title=

मुंबई : कृती समितीच्या नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे मुंबईसह राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, रत्नागिरी आणि वसईत आंदोलनं झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम, तर जळगावात रेल्वे रोको केला जाईल, असंही सांगण्यात येतं.

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत न झाल्याने नाराज झालेल्या कृती समितीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईसह आज राज्यभरात आंदोलनं करण्याचा इशारा कृती समितीच्या नेत्यांनी दिलाय.

आज सकाळी ठाण्यावरुन सीएसटीकडे जाणारी लोकल धनगर सामाजानं अडवली होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा फटका बसला, आता मात्र वाहतूक सुरळीत झाली आहे.

पुण्यात महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. चांदणी चौकातही धनगर समाजाने आंदोलन सुरू ठेवलं आहे. पंढरपूर शहरात येणारे सर्व रस्ते धनगर समाजाच्या आंदोलकांनी रोखले होते.

सोलापुरात शहरातही धनगर समाजाच्या आंदोलनाचा जोर दिसून येत आहे, शहरातील प्रमुख रस्त्यावर आंदोलक घोषणाबाजी करतांना दिसून येत आहेत. अहमदनगर-मनमाड हायवेवर धनगर समाजाचं आंदोलन केल आणि कार्यकर्त्यांनी वाहतूक अडवली धरली होती.

आरक्षणासाठी धनगर समाजाने राज्यात ठिकठिकाणी जोरदार आंदोलनाला सुरूवात केली आहे. अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.