resarvation

संघ आरक्षण आणि घटनाविरोधी : प्रकाश आंबेडकर

नागपुरात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारीप बहुजन महासंघाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Dec 15, 2016, 09:14 PM IST

धनगर समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा

धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आज यशवंत सेनेच्या वतीन मंत्रीमंडळ बैठकीवर भव्य मोर्चा काढण्यात आला.

Oct 4, 2016, 11:08 PM IST

'माझा बाप राहिला असता, तर सगळेच मिळाले असते'

धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन देतांना पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 'माझा बाप असता, तर सगळेच मिळाले असते. वेळ लागत असला, तरीही भाजपच्या सत्तेमधूनच धनगर समाजाला आरक्षण मिळणार’, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Jun 1, 2016, 11:26 AM IST

महिलांना तामिळनाडूत ५० टक्के आरक्षण

तामिळनाडू सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण विधेयक मंजुर केले आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचं सरकारने म्हटलं आहे,  यापूर्वी तामिळनाडूत महिलांना ३० टक्के आरक्षण होते.

Feb 20, 2016, 10:22 PM IST

धुळे, नंदूरबारमध्येही पटेल आरक्षणाची मागणी

गुजरातमध्ये मंगळवारी पटेल समाजाच्या आरक्षणासाठी भव्य रॅली पाहिल्यानंतर, महाराष्ट्रातही पटेल समाजाच्या आरक्षणाची मागणी वाढली आहे. धुळे आणि नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील काही भागात पटेल समाज आहे.

Aug 26, 2015, 05:03 PM IST

'धनगर समाजाला दिलेल्या शब्दापासून मागे हटणार नाही'

महायुतीने धनगर समाजाला जो शब्द दिला आहे, त्या शब्दापासून महायुती मागे हटणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केलं आहे, या शिवाय आदिवासी समाजाच्या आरक्षणातला वाटा, आम्ही कोणालाही देणार नसल्याचंही  मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Jan 4, 2015, 05:59 PM IST

'राष्ट्रवादी धनगर समाजाच्या आरक्षणाविरोधात नाही'

धनगर समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. धनगर समाजाला तिसऱ्या सूचीत टाकण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे, असंही पवारांनी स्पष्ट केलंय.

Aug 17, 2014, 12:56 PM IST

आरक्षणावर घोंगड पांघरणाऱ्या सरकारला 'धनगरांची आंदोलनाची काठी'

कृती समितीच्या नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे मुंबईसह राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, रत्नागिरी आणि वसईत आंदोलनं झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम, तर जळगावात रेल्वे रोको केला जाईल, असंही सांगण्यात येतं.

Aug 14, 2014, 01:43 PM IST

आदिवासी आणि धनगर नेत्यांमधील संघर्षही शिगेला

आरक्षणावरून आदिवासी आणि धनगर समाजातला संघर्ष शिगेला पोहचलाय. धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करू नये, या मागणीसाठी आदिवासी नेते आणि मंत्री दिल्लीत धडकले.

Jul 28, 2014, 09:42 PM IST

7 जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाला अडचणी

राज्य सरकारनं मराठा-मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला, मात्र आता त्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण होतायत. यात प्रमुख्यानं आदिवासी क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Jul 6, 2014, 05:49 PM IST

रेल्वे आरक्षण घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

कोकण रेल्वे आरक्षण घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिलेत. 

Jul 1, 2014, 12:05 AM IST