स्केच: याच नराधमानं केला ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

अॅन्टॉप हिल परिसरात एका नराधमाने पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केलाय. हे कृत्य करून आरोपी फरार झालाय. सीसीटीव्ही फुटेज असूनही अजूनही कुणाला अटक झाली नाही. प्रकरणाच्या हद्दीच्या वादात अडकून एफआयआर दाखल करण्यास उशीर करणाऱ्या दोन पोलिसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित केलंय. दरम्यान आरोपी नराधमाचं स्केच प्रसिद्ध करण्यात आलंय. 

Updated: Apr 25, 2015, 12:53 PM IST
स्केच: याच नराधमानं केला ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार title=

मुंबई: अॅन्टॉप हिल परिसरात एका नराधमाने पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केलाय. हे कृत्य करून आरोपी फरार झालाय. सीसीटीव्ही फुटेज असूनही अजूनही कुणाला अटक झाली नाही. प्रकरणाच्या हद्दीच्या वादात अडकून एफआयआर दाखल करण्यास उशीर करणाऱ्या दोन पोलिसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित केलंय. दरम्यान आरोपी नराधमाचं स्केच प्रसिद्ध करण्यात आलंय. 

घटना मंगळवारची आहे... अॅन्टॉप हिल परिसरातल्या विजयनगरमध्ये आपल्या आई- वडील आणि भावंडांसह ही चिमुरडी राहते. तिला आईने शेजारी असलेल्या दुकानातून वस्तू आणण्यास पाठवलं... खूप वेळ होऊन गेला तरी ती परत आली नाही म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला पण ती सापडली नाही. तिला एका अज्ञात नराधमाने आमिष दाखवून पळवून नेलं होतं. 

अॅन्टॉप हिल परिसरातल्या मनोरंजन उद्यान असं लिहिलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर तिला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही चिमुकली रडत असल्यानं तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत घाडगे यांनी दिली. 
एवढा गंभीर गुन्हा घडला असताना पोलीस मात्र हद्दीच्या वादात अ़डकले. अॅन्टॉप हिल पोलीस घटनास्थळी पोहोचले पण हे प्रकरण आपल्या हद्दीत येत नाही असं म्हणून त्यांनी वेळ घालवला. त्यानंतर हे प्रकरण वडाळा पोलिसांकडे सोपवण्यात आलं. 

वडाळा पोलिसांनी गुन्हा नोंदवून मुलीला रात्री एक वाजण्याच्या सुमाराला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी पाठवलं. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू आहे. 

या सर्व प्रकारामुळे या चिमुकलीचे वडील हादरून गेलेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून किंवा सदर प्रकरणात माहिती असल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.