मुंबई : थर्टीफस्टला तळीरामांना सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी बार मालकांची असेल, अपघात कमी करण्याच्या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांकडून बार मालकांना या सूचना देण्यात आल्या आहेत.
थर्टीफर्स्टला बारमध्ये बसून मद्यपान केलेला एखादा व्यक्ती, पायात पाय टाकत पाय बाहेर निघाला आणि त्याला घर गाठणं अशक्य होईल असं वाटत असेल, किंवा त्याने तिथेच टेबलावर मान टाकली, तर त्याला सुखरूप घरी पोहचवण्याच काम हे बार मालकाचं असेल, यासाठी मुंबई पोलिसांनी बारमालकांसाठी एक परिपत्रक काढलंय.
थर्टीफस्टला अपघातांची मालिका कमी व्हावी हा यामागील उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.
या संदर्भातलं परित्रक लवकरच बारमालकांना मिळण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.