मुंबई : राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होतेय. आणि हे नवे ठाकरे आहेत, अमित राज ठाकरे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी राज्याचा दौरा आयोजित केला होता. मात्र त्यांची मुलगी उर्वशी हिला अपघात झाल्यानं सध्या ते कौटुंबिक कारणांमुळे व्यस्त आहेत. पण आता वडिलांचा वारसा चालवायचं ठरवलंय अमित ठाकरे यांनी.
अमित ठाकरे यांनी बुधवारपासून विधानसभा मतदारसंघांना भेट द्यायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी मलबार हिल आणि मुंबादेवी या विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.