'झी 24 तास'चं पाऊल शेअर बाजारात

शेअर बाजारात आता 'झी 24 तास'चं पाऊल पडले आहे. शेअर बाजारातील घडोमोडींबरोबर व्यवहाराची सुरूवात कशी होते. त्याठिकाणी कोणते नवीन शेअर दाखल झाले आहेत. कशी गुंतवणूक करायची, शेअर बाजार म्हणजे काय? आदी प्रश्नांची उकल आता 'झी 24 तास'च्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेणे शक्य होणार आहे.

Updated: Mar 23, 2012, 11:09 AM IST

www.24taas.com, मुंबई

शेअर बाजारात आता 'झी 24 तास'चं पाऊल पडले आहे.  शेअर बाजारातील  घडोमोडींबरोबर व्यवहाराची सुरूवात कशी होते. त्याठिकाणी कोणते नवीन शेअर दाखल झाले आहेत. कशी गुंतवणूक करायची, शेअर बाजार म्हणजे काय? आदी प्रश्नांची उकल आता 'झी 24 तास'च्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेणे शक्य होणार आहे.

सभोवार घडणा-या घटना आणि त्यांचं विश्लेषण याबाबतीत आमच्या प्रेक्षकांना नेहमीच एक पाऊल पुढे ठेवणा-या 'झी 24 तास'नं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक नवा संकल्प केलाय. मराठी माणसाला बचतीकडून गुंतवणुकीकडे नेण्याचा. त्यासाठीच आजपासून आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय शेअर बाजाराचा धावता आढावा. यानिमित्तानं अर्थ साक्षरतेतही मराठी माणसाचं एक पाऊल पुढे पडावं हीच आमची इच्छा आहे.

केवळ शेअर बाजारातल्या घडामोडीच आपणापर्यंत पोहचवून आम्ही थांबणार नाही, तर शेअर बाजारातील गुंतवणूक, पर्सनल फायनान्स याविषयी राष्ट्रीय पातळीवरच्या तज्ज्ञांचा सल्लाही आम्ही आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत. लवकरच एका नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही सुरूवात होत आहे. त्यासाठी पाहात राहा 'झी 24 तास'.