गुढीपाढवा आणि मराठी वर्षाचा जल्लोष

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईत लालबागमध्येही गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला उत्साहाचं वातावरण होतं. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. तसंच मशाल पेटवून शोभायात्रा काढण्यात आली.

Updated: Mar 23, 2012, 09:54 AM IST

www.24taas.com, मुंबई

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईत लालबागमध्येही गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला उत्साहाचं वातावरण होतं. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. तसंच मशाल पेटवून शोभायात्रा काढण्यात आली.

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा...मराठी नववर्षाची सुरूवात आजच्या दिवसापासून होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा होय. महाराष्ट्रात आज वेगवेगळ्या ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं. अशाच नववर्ष स्वागत यात्रेचं डोंबिवलीतही आयोजन केले. गिरगाव, ठाणे, नाशिक, पुणे, रत्नागिरी आदी ठिकाणी जल्लोषात मराठी नववर्षाचे आज सकाळी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी रथयात्रा, लेझिप पथक आणि रांगोळ्या काढून मराठी वर्षाचे स्वागत केले.

डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेचं यंदाचं हे १४ वं वर्ष आहे. यावर्षी स्वच्छ डोंबिवली, सुंदर डोंबिवली ही संकल्पना चित्ररथांसाठी देण्यात आली आहे. एकूण ८५ते९० चित्ररथ यावर्षी नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झालेत. आणि शंभरहून अधिक संस्थाही या स्वागत यात्रेत सहभागी झाल्या आहेत.

तमाम डोंबिवलीकरांच्या साक्षीनं भागशाळा मैदानापासून सुरू झालेली ही नववर्ष स्वागत यात्रा डोंबिवली पूर्वेतल्या फडके रोडवर समाप्त होणार आहे. आजच्या या स्वागत यात्रेत माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस, बांधकाम व्यावसायिक म्हैसकर, आमदार रवींद्र चव्हाण असे अनेक मान्यवर सहभागी झालेत.