चाळींच्या पुनर्बांधणी मागणीकडे दुर्लक्ष

मुंबईच्या चर्चगेट जवळील ए,बी,सी आणि डी रोड परिसरात राहणा-या नागरिकांचा पुनर्बांधणीचा मागणीकडे दुर्लक्ष करणा-या हेरिटेज कमीटीवर माजी सदस्यांनी जोरदार टीका केली आहे. इथल्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या विषयावर प्रशासनानं लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Updated: Jun 9, 2012, 03:41 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईच्या चर्चगेट जवळील ए,बी,सी आणि डी रोड परिसरात राहणा-या नागरिकांचा पुनर्बांधणीचा मागणीकडे दुर्लक्ष करणा-या हेरिटेज कमीटीवर माजी सदस्यांनी जोरदार टीका केली आहे. इथल्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या विषयावर प्रशासनानं लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मुंबईच्या चर्चगेट स्टेशन जवळच्या ए,बी, सी आणि डी रोड परिसरातल्या समुद्राजवळच्या इमारतींचा हेरिटेज स्ट्रक्चर ग्रेड 3 मध्ये त्यांचा समावेश होतो. जुन्या झालेल्या या इमारतींच्या पुर्नबांधणीची परवानगी या इमारतीतले स्थानिक नागरिक करतायत. पण हेरिटेज कमिटीनं आजवर त्यांना पुर्नबांधणीची परवानगी दिलेली नाही. स्थानिक नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणा-या हेरिटेज कमिटीवर माजी हेरिटेज कमिटी सदस्य आणि तज्ज्ञांनी टीका केलीय.

स्थानिकांना पुनर्बांधणीची परवानगी देणं महापालिका आयुक्त सिताराम कुंटेंच्या हातात आहे. बदलत्या मुंबईची गरज बघता अर्बन टाउन प्लॅनर्संनीही स्थानिक नागरिकांच्या पुनर्बांधणीच्या मागणीचं समर्थन केलंय. हेरिटेज स्ट्रक्चरच्या ग्रेड 3 लेव्हलमध्ये असून सुद्धा या इमारतींना पुनर्बांधणीची परवानगी मिळत नसल्यानं स्थानिकांमध्ये संताप आहे. जनमानसाच्य़ा भावनांचा विचार करुन सरकारनं पुनर्बांधणीचा हा तिढा सोडवावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.