गोरेगावात गरोदर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

मुंबईतल्या गोरेगावात एका गरोदर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला आहे. गोरेगावातल्या वनराई परिसरात हा प्रकार घडल्यानं खळबळ माजली आहे.

Updated: Mar 1, 2012, 01:33 PM IST

www.24taas.com,मुंबई

 

मुंबईतल्या गोरेगावात एका गरोदर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला आहे. गोरेगावातल्या वनराई परिसरात हा प्रकार घडल्यानं खळबळ माजली आहे.

 

पीडित महिलेचं अज्ञात लोकांनी कारमधून अपहरण केलं. त्यानंतर तिला काही अंतरावर नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. शिवाय तिच्याजवळचा मौल्यवान ऐवजही लुटण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

 

मुंबईत दिवसाढवळ्या गरोदर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.