रोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव

रोड रोमियोंच्या क्रूरपणामुळं एका महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना नागपुरात घडलीय. 

Updated: Nov 24, 2015, 02:24 PM IST
रोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव title=

नागपूर : रोड रोमियोंच्या क्रूरपणामुळं एका महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना नागपुरात घडलीय. 

विशाखा माकडे नावाची तरूणी आपली आई सुनिता यांच्यासोबत दुचाकीने जात असताना तीन बाइकस्वार रोड रोमिओंनी तिची छेड काढली. नागपूर ते रामटेक या प्रवासात त्या तिघा बाइकस्वारांनी त्यांचा पाठलाग केला. 

या तिघे एव्हढ्यावरच थांबले नाहीत तर बळजबरीनं दुचाकीला धक्का देत विशाखा आणि सुनिता माकडेंचा अपघात घडवून आणला. या अपघातात दुर्दैवानं आई सुनिताचा मृत्यू झाला. 

धक्कादायक बाब म्हणजे एवढं सगळं घडल्यानंतरही पोलीस या गंभीर प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतायत. हा निव्वळ अपघात असल्याचं भासवण्याचा नागपूर पोलिसांचा खटाटोप दिसतोय, असा आरोप विशाखानं केलाय.

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींना ओळखणं शक्य असताना, पोलीस त्याकडे कानाडोळा करत असल्याची तक्रार पीडित तरूणीनं केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.