उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी

उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहायला मिळाली. साई पक्षाच्या महिला कार्यकार्त्याना बेदम मारहाण करण्यात आली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 22, 2017, 08:48 AM IST
उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी  title=

कल्याण : उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहायला मिळाली. साई पक्षाच्या महिला कार्यकार्त्याना बेदम मारहाण करण्यात आली.

साई पक्षाचे कार्यकर्ते प्रभाग क्रमांक 11 मध्ये पैसे वाटप असल्याच्या संशयावरुन, भाजप कार्यकर्ते त्या ठिकाणी आचारसंहिता पथक घेऊन गेले. मात्र साई पक्षाच्या कार्यालयात त्यांना काहीच आढळून आलं नाही. त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना फोन करून बोलावून घेतलं. आणि त्यांच्याकरवी साई पक्षाच्या महिला कार्यकार्त्याना बेदम मारहाण केली. 

भाजपच्या महिला कार्यकार्त्यांनी साई पक्षाच्या महिलांचे अक्षरशः कपडे फाडले. इथेच न थांबता त्या महिलांचे केस पकडून त्यांना जमिनीवर लोळवलं. सर्वात गंभीर बाब म्हणजे हा सर्व प्रकार आचारसंहिता पथक आणि पोलीस अधिका-यांच्या डोळ्यादेखत घडला.

दरम्यान सकाळी याच प्रभागातल्या साई पक्षाच्या उमेदवार आणि माजी महापौर आशा ईदनानी यांच्या गाडीची अज्ञानांकडून तोडफोड केली गेली होती.