ठाणे : भिवंडीतील अनधिकृत टेलीफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १७.५४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.
कोणाला थांगपत्ता न दाखवता आरोपींनी इंटरनॅशनल कॉल करण्याची यंत्रणा उभी केली होती. त्यामुळे या टेलीफोन एक्स्चेंजचा वापर विदेशात फोन करण्यासाठी केला जात होता, का याचा पोलीस तपास करत आहेत. या अनधीकृत टेलीफोन एक्सेंजमुळे सरकारचा ३० कोटींचा महसूल बुडाल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
विशेष म्हणजे सुरक्षा यंत्रणेला ट्रेस करता येऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय कॉल व्हीओआयपीद्वारे प्राप्त करत होते. त्यानंतर बनावट एक्स्चेंजद्वारे तो कॉल डोमेस्टीक कॉलमध्ये ट्रान्सफर करुन भारतीय मोबाईल किंवा लँडलाईनशी जोडला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक करुन १७ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.