नागपूर: (अखिलेश हळवे, प्रतिनिधी) - नागपूर इथं खुनबाजीचं सत्र सुरू आहे. गेल्या 3 दिवसांत 3 खून शहरात झालेत. त्यामुळे नागरिक धास्तावलेत.
नागपूरच्या दिघोरी भागातल्या टोल नाक्यावर भांडणात एका व्यक्तीचा जीव गेला. टोल देण्यावरून हे भांडण झालं असलं, तरी हा एकमेव गुन्हा नाही. गेल्या तीन दिवसांत नागपूरमध्ये गेल्या तीन दिवसांत तीन खून झालेत. अनोखळी हल्लेखोरानं एका महिलेचा आणि एका विक्रेत्याचा निर्घृणपणे खून केला. त्यामुळे नागरिक धास्तावलेत
या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच नागपूर दौऱ्यावर आलेल्या पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पण गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणत्याही उपाय योजना ते सांगू शकले नाहीत.
गुन्हेगारांना पोलिसांची भिती राहिलेली नाही हे या घटनांवरून सिद्ध होतंय. त्यामुळं आता पोलिसांना शक्य नसेल तर राज्य सरकारनं या कामी पुढाकार घेणं गरजेचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.