लाचखोर अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधी रूपये

शेतक-यांकडून लाच घेताना अटक झालेल्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आढळून आली आहे.

Updated: Jul 17, 2014, 09:58 PM IST
लाचखोर अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधी रूपये title=

उस्मानाबाद : शेतक-यांकडून लाच घेताना अटक झालेल्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आढळून आली आहे.

महिन्याभरापूर्वी राऊत परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होत्या. त्यांच्या तिथल्या घरावर टाकलेल्या छाप्यांमध्येही लाखोंची रोकड, दागिने, बचत प्रमाणपत्र, बँक खात्यांचे रेकॉर्ड अशी 88 लाख 79 हजारांची संपत्ती हाती आलेय.

राऊत यांना काल लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं शेतक-याकडून 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं... परभणीमध्ये राऊत यांचा एक नातलग बरीच रक्कम दुसरीकडे हलवण्याच्या तयारीत होता.

मात्र त्याचा हा डाव अपयशी झाला. परभणी शहरातल्या देशमुख हॉटेल परिसरातल्या एका घरात शोभा राऊत भाड्याने राहात होत्या.

लाच घेताना अटक झाल्यावर एसीबीने त्यांच्या परभणी इथल्या घराची कसून तपासणी केली. पोलिसांनी या घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना तिथे कपडे, धान्याची कोठी, पर्सेस यांच्यात पैसे दडवून ठेवलेले आढळले. 

तसंच घरात रोख चिल्लरही मोठ्या प्रमाणात सापडली आहे. राऊत यांच्या संपत्तीची मोजदाद अजूनही सुरूच आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.