बारवर पोलिसांचा छापा, 26 मुली, 14 ग्राहक ताब्यात

ठाण्यातील शिळफाटा परिसरात असलेल्या उत्सव बारवर पोलिसांनी छापा टाकला. जवळपास २६ मुली आणि १४ ग्राहक आणि हॉटेलचे कर्मचारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

Updated: Apr 17, 2015, 06:48 PM IST
बारवर पोलिसांचा छापा, 26 मुली, 14 ग्राहक ताब्यात title=
फाईल फोटो

ठाणे: ठाण्यातील शिळफाटा परिसरात असलेल्या उत्सव बारवर पोलिसांनी छापा टाकला. जवळपास २६ मुली आणि १४ ग्राहक आणि हॉटेलचे कर्मचारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या या बारविरोधात तक्रारी येत होत्या. हा बार डायघर पोलीस स्टेशनच्या अगदी समोर आहे. तरीही कोणतीही कारवाई होत नव्हती. अखेर आज ठाणे पोलिसांच्या एसबी विभागाने ही कारवाई केलीय.

महत्वाचं म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्यापैकी काही मुली अल्पवयीन असल्याचा संशय आहे. त्या अनुषंगानेही तपास सुरू आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.