मुंबई : पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा खोळंबा होऊ नये, शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय.
तूर्तास फक्त फॉर्म भरून दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार आहे... तसे आदेशच शिक्षण विभागानं दिलेत. विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी वेगळा वेळ देण्यात येणार आहे.
काही पालकांनी, शाळांनी, अभावीपच्या शिष्टमंडळानं दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी भरताना ५००, १००० च्या नोटांमुळे अडचण येत असल्याचं सांगितलं... मुलांनी १९ नोव्हेंबरपर्यंत केवळ फॉर्म नक्की भरावा.... परीक्षा फी भरायची मुदत आम्ही वाढवू... गरज लागली तर ही मुदत फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात येईल. ५००, १००० च्या नोटांमुळे या मुलांचं नुकसान होणार नाही, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय. यंदा, दहावीच्या परीक्षेला १७ लाख विद्यार्थी आणि बारावीच्या परीक्षेला १४ लाख विद्यार्थी आहेत.