स्मार्ट सिटी : राज ठाकरेंच्या टीकेनंतर नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची पंचाईत

केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानं नाशिक शहरातील सत्तधारी मनसे पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. स्मार्ट सिटी योजेनेच्या पुरस्कारासाठी शहरात मनपाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबविण्यात आलेत. मात्र आता नाशिक शहराचा या योजनेतील प्रवासच अनिश्चित समजला जातोय.

Updated: Dec 10, 2015, 09:36 PM IST
स्मार्ट सिटी : राज ठाकरेंच्या टीकेनंतर नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची पंचाईत title=

नाशिक : केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानं नाशिक शहरातील सत्तधारी मनसे पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. स्मार्ट सिटी योजेनेच्या पुरस्कारासाठी शहरात मनपाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबविण्यात आलेत. मात्र आता नाशिक शहराचा या योजनेतील प्रवासच अनिश्चित समजला जातोय.

अधिक वाचा : नवी मुंबई शहर 'स्मार्ट सिटी' स्पर्धेतून होणार बाहेर?

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेवर राज ठाकरेंनी ही टीका केली आणि नाशिकमधल्या सत्ताधारी मनसेची चांगलीच पंचईत झालीय. देशातल्या १०० शहरात नाशिकचाही समावेश आहे. या योजनेचा नाशिकमध्ये चांगलाच गवगवा झाला. पहिल्या फेरीतल्या प्रवेशानंतर दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठीचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला. त्यात नाशिककरांवर होणाऱ्या संभाव्य करवाढीला आणि एसपीव्ही संस्थेच्या हस्तक्षेपाला नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला. एसपीव्ही आणि करवाढीला विरोध करून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव महासभेनं मंजूर केला.

अधिक वाचा : स्मार्ट सिटी योजना फसवी : राज ठाकरे

मात्र, आता राज ठाकरे यांनी विरोध केल्याने नाशिक मनसेची चांगलीच पंचईत झालीय. त्यामुळे मनसेचे नेते कॅमेऱ्यासमोर बोलणे टाळत आहेत. भाजप नेत्यांचं मात्र पित्त खवळलंय.

स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसेमध्ये नाशिकमध्ये राजकारण पेटलंय. मात्र भविष्यातलं विकासाचे श्रेय भाजप हिरावून घेईल या भीतीने इतर शहरातूनही स्मार्ट सिटी योजनेला विरोध सुरू झाला. मात्र, विरोधाच्या या राजकारणात शहरातल्या नागरिकांना काय हवं आहे, याचा विचार करायला कोणाकडेच वेळ नाही, असं चित्र दिसत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.