हत्येची आदली रात्र, आरोपींची मीटिंग अन् ढाबा....; संतोष देशमुख प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

Santosh Deshmukh Murder: आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांनी नांदूरा फाटा परिसरातील एका धाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 16, 2025, 08:53 PM IST
हत्येची आदली रात्र, आरोपींची मीटिंग अन् ढाबा....; संतोष देशमुख प्रकरणात धक्कादायक माहिती उघड title=

Santosh Deshmukh Murder: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. ज्या पद्धतीने देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला. मात्र आता या हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांनी नांदूरा फाटा परिसरातील एका धाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट.. 

ढाब्यावर शिजला हत्येचा कट

नांदूरा फाट्यावरील ढाब्यावर आरोपींची मिटींग

आदल्या रात्रीच ठरला हत्येचा प्लॅन

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली. मात्र या हत्याच कट एक दिवस आधीच रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांनी नांदूरा फाटा परिसरातील एका धाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आलीय.

- 8 डिसेंबर- आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी एका ढाब्यावर हत्येचा कट रचला

- 9 डिसेंबर - कटानुसार सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली

- बीडच्या नांदूर फाटा परिसरातील एका ढाब्यावर हत्येचा कट

- 14 जानेवारी -  रोजी संबंधीत ढाबा चालकाची चौकशी 

- कट रचत असताना ढाब्यावर विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेसोबत इतरही काही लोक असल्याची माहीती

- कटात अजून कुणाचा सहभाग शोध सुरू

सरपंच देशमुख यांची हत्या ही पूर्वनियोजित कट होता हे यावरून स्पष्ट होत आहे. आरोपींनी कट करून संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींव्यतिरिक्त या कटात अजून कोण कोण सहभागी होतं याचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळणेही तितकंच महत्वाचं आहे.