बॉडी स्प्रे वापरणाऱ्यांना सावध करणारी एक महत्त्वाची बातमी. कर्जतमध्ये एका लहान मुलानं खेळता खेळता बॉडी स्प्रे स्वयंपाकघरात नेला आणि गॅसजवळ ठेवला. त्यानंतर जे झालं त्यानं संपूर्ण परिसर हादरुन गेला.
बॉडी स्प्रे वापरत असाल तर सावधान!
बॉडी स्प्रेमुळे तुमच्याही घरात होऊ शकतो स्फोट
कर्जतमधील घटनेनं राज्यात खळबळ
बॉडी स्प्रेच्या या छोट्याशा बाटलीने कर्जतमधल्या घराची अशी दशा केली आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत शहरात राहणारे राहुल डाळींबकर यांच्या घरात बॉडी स्प्रेच्या बाटलीचा स्फोट झाला. त्याचं झालं असं डाळींबकर यांचा छोटा भाचा स्वयंपाकघरात खेळत होता. त्याच्या हातात बॉडी स्प्रेची बाटली होती. त्यानं तो बॉडी स्प्रे गॅसच्या शेगडीजवळ ठेवला. मात्र गॅसच्या उष्णतेनं अचानक बॉडी स्प्रेचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजानं परिसर हादरून गेला. या स्फोटात डाळींबकर यांच्या भाच्यासह घरातील सगळे सुदैवाने बचावले. पण घरावरील छपराचे पत्रे उडाले. खिडक्यांच्या काचा फुटल्या. धक्कादायक म्हणजे घरातल्या भिंतीत या काचा घुसल्या. घराच्या भिंतींना तडेही गेले.
बॉडी स्प्रे हा ज्वलनशील पदार्थ
परफ्युम, बॉडी स्प्रेमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त
कल्कोहोल नसलं तरी इतर घटक ज्वलनशील
आग किंवा उष्णतेच्या संपर्कात आल्यावर बॉडी स्प्रेचा स्फोट
विमानातही परफ्युम, बॉडी स्प्रे नेण्यावर बंदी
त्यामुळं मुलांच्या हातात बॉडी स्प्रे देताना आणि स्वत:ही बॉडी स्प्रे वापरताना योग्य काळजी घ्या.. नाहीतर अपघाताला निमंत्रण मिळू शकतं.