अहमदनगर : दुष्काळावरून आता विरोधकांमध्येच जुंपण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच मराठवाड्यातील दुष्काळाला जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केलाय.
बारामतीच्या भागातील ऊसाला पाणी कमी पडू नये यासाठी बाराशे कोटी रुपयांचा भिमा स्थिरीकरण प्रकल्प हाती घेतला. तो पैसा गोदावरी खोऱ्यासाठी वापरला असता तर मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटला असता असा आरोपही बाळासाहेब विखे पाटलांनी केलाय.
मराठवाड्यात कायमचा दुष्काळ कसा राहील याच नियोजन बारामतीकरांनी मोठ्या खुबीने केलं असल्याची टिका बाळासाहेब विखे पाटील यांनी पवारांचं थेट नाव न घेता केली आहे. तर विखेंना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.