मीरा : जैन धर्मियांच्या पर्युषण पर्व काळात मांसविक्रीची दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयामुळं नव्या वादाला तोंड फुटलंय.
मीरारोड महापालिकेनं पर्युषण पर्व काळात दहा दिवस कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तर मुंबई महापालिकेनंही १० सप्टेंबर, १३ सप्टेंबर, १७ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर असे चार दिवस देवनार कत्तलखाना बंद ठेवला आहे. त्यामुळं मांस-मच्छी खाणा-या मंडळींनी जोरदार आक्षेप घेतलाय.
आम्ही काय खायचं, हे देखील सरकार ठरवणार का? असा संतप्त सवाल आता केला जातोय. तर पर्युषण काळात दहा दिवस कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय लोकशाहीविरोधी आहे, असं मत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी व्यक्त केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.