'मी स्कर्ट वर करुन हळूच...', श्रीदेवीच्या धाकट्या लेकीनं सांगितला Exam Hall मधला 'तो' किस्सा

Sridevi Daughter Revealation: अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी कन्या आणि जुनैद खान या दोघांचा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून त्यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत खुशीने एक खुलासा केलाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 24, 2025, 03:57 PM IST
'मी स्कर्ट वर करुन हळूच...', श्रीदेवीच्या धाकट्या लेकीनं सांगितला Exam Hall मधला 'तो' किस्सा title=
एका मुलाखतीमध्ये सांगितला हा किस्सा

Khushi Kapoor Junaid Khan Revealation: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी (Sridevi Daughter) खुशी कपूर आणि अभिनेता आमीर खानला मुलगा जुनैद खान हे दोघेही सध्या बराच वेळ एकत्र घालवत आहेत. हे दोन्ही तरुण कलाकार सध्या त्यांच्या 'लव्हयापा' नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यवस्त आहेत. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटामध्ये खुशी आणि जुनैद हे एकमेकांच्या प्रेमात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. प्रेमात पडलेलं हे जोडपं लग्न झाल्यानंतर एक विचित्र निर्णय घेतं आणि त्यानंतर काय होतं असं चित्रपटाचं कथानक आहे. हा निर्णय म्हणजे दोघे एका दिवसासाठी एकमेकांचा फोन एक्सचेंज करण्याचं ठरवतात आणि त्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण होतं की इतर काही याबद्दलची रंजक कथा चित्रपटातून मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानिमित्त दोघे अनेक ठिकाणी मुलाखती देत असून या मुलाखतींमधून पुढे येणारे अनेक किस्सेही चर्चेत आहेत. अशाच एका मुलाखतीमध्ये जुनैद आणि खुशीने परिक्षेत ते कशाप्रकारे कॉपी करायचे आणि कसे पकडले जायचे याबद्दलचा खुलासा केला आहे.

जुनैदला मित्र करायचे मदत

जुनैदने परीक्षेत एमसीक्यू म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी कॉपी केल्याचं सांगितलं. जुनैदने त्याचा एक मित्र परीक्षेत त्याच्या पाठीमागेच बसायचा. हाच मित्र पाठीमागून जुनैदच्या बेंच खालून पायाला स्पर्श करुन उत्तर ठाऊक असल्याचा इशारा करत मदत करायचा, असं सांगितलं. जुनैदला तरी मित्र मदत करायचे मात्र खुशी स्वता: कॉपी करण्यासाठी बरीच तयारी करुन जायची असं तिनेच सांगितलं आहे. अर्थात त्यांनी या गोष्टी कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं या हेतूने न सांगता त्यावेळी कॉपी केली असली तरी आता त्याचा पश्चाताप होतोय हे अधोरेखित करण्यासाठी सांगितलं आहे. खुशीनेही तिची कॉपी करण्याची पद्धत कशी होती याबद्दल सविस्तरपणे सांगताना अंगावर आपण उत्तरं लिहून घेऊन जायचो असं म्हटलंय.

खुशी म्हणाली, 'मी स्कर्ट वर करुन हळूच...'

परीक्षेमध्ये कधी आणि कशाप्रकारे कॉपी केली आहे याबद्दल बोलताना खुशीने, "मी अनेकदा परीक्षेत कॉपी केली आहे. मात्र मला कधीच पकडण्यात आलं नाही," असं सांगितलं. जुनैदनेही आपली कॉपी कधीच पकडली गेली नाही असं सांगितलं.

नक्की वाचा >. Photos: 28 वर्षीय डॉक्टरला डेट करतोय 58 वर्षांचा अभिनेता? तुम्हीही त्याला नक्कीच ओळखता; पण 'ती' कोण?

आपल्या शालेय जीवनामधील कॉपीचा अनुभव सांगताना खुशीने, "एका मी माझ्या मांडीवर एक संपूर्ण आकृती काढली होती. मात्र विज्ञानाच्या पेपरला हा कॉपी करण्याचा सर्वोत्त मार्ग आहे असं मला त्यावेळी का वाटलं होतं हे मी आता सांगू शकत नाही. मी मांडीवर स्केच पेनने संपूर्ण फुलाची आकृती काढून त्याच्या वेगवेगळ्या भागांना काय म्हणतात त्याची नावंही लिहिली होती. आम्ही शाळेत स्कर्ट घालायचो. त्यामुळे मी पेपर सुरु असताना स्कर्ट वर करुन हळूच आकृती पाहून घ्यायचे आणि त्यामधील माहितीनुसार लिहून काढायचे," असं सांगितलं.