संघ आरक्षण आणि घटनाविरोधी : प्रकाश आंबेडकर

नागपुरात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारीप बहुजन महासंघाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 15, 2016, 09:14 PM IST
संघ आरक्षण आणि घटनाविरोधी : प्रकाश आंबेडकर title=

नागपूर : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणविरोध आणि घटनाविरोधी आहे, अशी टीका केली आहे. नागपुरात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला, तेव्हा त्यांनी संघावर हा आरोप केला.

नागपुरात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारीप बहुजन महासंघाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी होती. 

 अॅट्रॉसिटी कायदा सक्षम करावा, दलितांवर होणारा अन्याय थांबवावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात भारिप बहुजन महासंघासहित सर्व कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. या मोर्चाला पटवर्धन मैदानापासून सुरूवात झाली आणि मॉरिस कॉलेज जवळ मोर्चाची सांगता झाली.