पुणे महापालिका निवडणुकांचं आरक्षण जाहीर

पुणे महापालिकेच्या 2017 च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांची प्रभाग रचना आणि आरक्षण आज जाहीर झालं.

Updated: Oct 7, 2016, 04:41 PM IST
पुणे महापालिका निवडणुकांचं आरक्षण जाहीर  title=

पुणे : पुणे महापालिकेच्या 2017 च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांची प्रभाग रचना आणि आरक्षण आज जाहीर झालं. पहिल्यांदाच 4 वॉर्डांचा एक प्रभाग अशा पद्धतीने होणाऱ्या या निवडणुकीत 41 प्रभाग असतील. यातून 162 नगरसेवक निवडून येतील.

यामध्ये निम्म्या म्हणजेच 81 महिला असणार आहेत. आरक्षणामध्ये 44 वॉर्डस obc उमेदवारांकरता तर 22 वॉर्डस sc उमेदवारांकरता आरक्षित असतील. 2 वॉर्डस st उमेद्वारांकर्ता आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

10 ऑक्टोबर पासून प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्यात येतील तर 4 नोव्हेंबरला समिती समोर हरकतींची सुनावणी होऊन त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. दरम्यान ही प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादीनं भाजपवर आरोप केले आहेत. आमदार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे. भाजपनं मात्र हे आरोप फेटाळले आहेत. 

पाहा आरक्षणाची संपूर्ण यादी