कोपर्डी बलात्कारप्रकरणी 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल

कोपर्डी बलात्कार आणि ह्तेयप्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Updated: Oct 7, 2016, 04:21 PM IST
कोपर्डी बलात्कारप्रकरणी 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल title=

कोपर्डी : कोपर्डी बलात्कार आणि ह्तेयप्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 86 दिवसांनी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

साधारण 300 पेक्षा जास्त पानांचं हे आरोपपत्र आहे.  जितेंद्र शिंदे, संतोष भवर आणि नितीन भैलुमे या तिघा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. हत्या आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा  त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय.