कोस्टगार्ड कार्यालयातील नोकरीचं आमिष दाखवून तरुणाला लाखोंचा गंडा

रत्नागिरी शहरात दोन वर्षांपूर्वीच दाखल झालेल्या कोस्टगार्ड कार्यालयात नोकरी लावतो असं आमिष दाखवत रत्नागिरीतील अनेक बेरोजगार तरूण आणि त्यांच्या पालकांना लाखो रूपयांचा गंडा घालण्यात आला.

Updated: May 16, 2015, 10:38 PM IST
कोस्टगार्ड कार्यालयातील नोकरीचं आमिष दाखवून तरुणाला लाखोंचा गंडा title=

रत्नागिरी: रत्नागिरी शहरात दोन वर्षांपूर्वीच दाखल झालेल्या कोस्टगार्ड कार्यालयात नोकरी लावतो असं आमिष दाखवत रत्नागिरीतील अनेक बेरोजगार तरूण आणि त्यांच्या पालकांना लाखो रूपयांचा गंडा घालण्यात आला.

बेरोजगारीनं त्रस्त असलेले तरुण आणि त्यांच्या पालकांना फसवून लाखो रुपये उकळण्याचं लोण आता रत्नागिरीसारख्या शहरातही पोहचलंय. मूळचा रत्नागिरीचा असलेल्या आणि गेली अनेक वर्षे मुंबईत स्थानिक असलेल्या अभिषेक बाईंग या तरुणानं घनश्याम नेरुळकरसह अनेकांना लूटलंय. रत्नागिरीत नव्यानं सुरु करण्यात आलेल्या कोस्टगार्ड विभागाच्या कार्यालयात नोकरी देण्याचं आमिष दाखवत लाखो रुपये उकळलेत... आता तर हा अभिषेक बाईंग घरातूनच गायब झालाय.

कोस्टगार्डचं लेटरहेड तयार करुन अभिषेकनं या तरुणांना बोगस नियुक्ती पत्रं दिलीत. इतकंच नाही तर त्यावर त्यानं केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या नावानं सहीसुद्धा केलीय. अनेक तरुणांनी कोस्टगार्डमध्ये नोकरी मिळणार या आशेनं आपल्या आईच्या अंगावरील दागिनेही गहाण ठेवलेत. तर काहींनी कर्ज काढलंय.. 

तरुणांची फसवणूक करण्यासाठी इथं कोस्टगार्डच्या नावाचा वापर करण्यात आलाय. छोट्या छोट्या गावात राहणाऱ्या बेरोजगार तरुणांच्या हतबलतेचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना लुबाडलं जातंय. त्यामुळं गरज आहे ती अशा भामट्यांपासून सावध राहण्याची.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.