पुण्यात ४ उमेदवार शंभर कोटींची धनी

 पुण्यात एकूण 4 उमेदवार शंभर कोटी क्लबचे मानकरी ठरले आहेत. त्याचप्रमाणे भाजप तसेच शिवसेनेच्या गटनेत्यांच्या संपत्तीत झालेली वाढ लक्षणीय आहे. तर शहरातील शंभरपेक्षा जास्त उमेदवार कोट्याधीश असल्याचं स्पष्ट झालंय. उमेदवारांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आलीय. पाहूया एक रिपोर्ट... 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 10, 2017, 11:19 PM IST
पुण्यात ४ उमेदवार शंभर कोटींची धनी  title=

अरूण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे :  पुण्यात एकूण 4 उमेदवार शंभर कोटी क्लबचे मानकरी ठरले आहेत. त्याचप्रमाणे भाजप तसेच शिवसेनेच्या गटनेत्यांच्या संपत्तीत झालेली वाढ लक्षणीय आहे. तर शहरातील शंभरपेक्षा जास्त उमेदवार कोट्याधीश असल्याचं स्पष्ट झालंय. उमेदवारांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आलीय. पाहूया एक रिपोर्ट... 

प्रभाग क्रमांक 1 -  कळस धानोरी

राष्ट्रवादीच्या उमेदवार रेखा टिंगरे

एकूण संपत्ती  - 143 कोटी 

प्रभाग क्रमांक 8 - औंध बोपोडी 

भाजपचे उमेदवार विजय शेवाळे - संपत्ती 195 कोटी 

प्रभाग क्रमांक 5 - वडगाव शेरी - कल्याणीनगर 

भाजपचे उमेदवार योगेश मुळीक - संपत्ती 109 कोटी 

प्रभाग क्रमांक 33 - वडगाव धायरी - वडगाव बुद्रुक 

राष्ट्रवादीचे उमेदवार अक्रूर कुदळे - संपत्ती 99.88 कोटी 

पुणे महापालिका निवडणुकीच्या रणांगणातील हे शतकवीर कोट्यधीश उमेदवार... या उमेदवारांची इतकी माया पाहून मतदारांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र आपण पूर्वापार श्रीमंत असल्याचं त्यांचं सर्वसाधारण उत्तर आहे. 

पुण्यामध्ये कोटीची उड्डाणे

पुण्यामध्ये कोटीची उड्डाणे गाठणा-यांत बहुतांश उमेदवार विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांच्या प्रगतीचा वेगही विस्मयकारक आहे.

गेल्या पाच वर्षांत माजी महापौर वैशाली बनकर यांची संपत्ती 81 लाखांवरून 2 कोटींवर गेलीय. 

चंचला कोद्रेंची संपत्ती 8 कोटींवरून 13 कोटींवर गेलीय. 

माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांची संपत्ती 7 कोटींवरून 27 कोटींवर गेलीय. 

राष्ट्रवादीचे सभागृह नेते शंकर केमसे यांची संपत्ती 25 कोटींवरून 66 कोटी झालीय. 

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांची संपत्ती 17 कोटींवरून 40 कोटींवर गेलीय. 
काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांची संपत्ती 2 कोटींवरून 7 कोटी, 

काँग्रेस नगरसेवक आबा बागुल यांची संपत्ती 1 कोटींवरून 4 कोटींवर गेलीय. 

माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांची संपत्ती 2 कोटींवरून 10 कोटीवर पोचलीय. 

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांची संपत्ती मागील 5 वर्षांत 3 कोटींवरून 9 कोटींवर गेलीय. 

मनसेचे नगरसेवक राजेंद्र वागस्कर यांची संपत्ती 1 कोटींवरून 7 कोटींवर गेलीय, 

मनसेचेच माजी गटनेते वसंत मोरे यांची संपत्ती 1 कोटींवरून 5 कोटींवर पोचलीय. 

भाजपचे गेटनेते गणेश बिडकर यांच्या संपत्तीत मागील 5 वर्षांत तब्बल अकरा पट वाढ झालीय. त्यांची संपत्ती दोन कोटींवरून 23 कोटींवर गेलीय. त्याचवेळी 

शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांची संपत्ती 5 लाखांवरून 1 कोटींवर गेलीय. त्यांच्या संपत्तीत सुमारे 40 पट वाढ झालीय.  

१०५ कोट्यधिश

याशिवाय भाजपचे श्रीकांत जगताप, श्रीनाथ भिमाले, प्रकाश ढोरे, अभिजीत कदम यांची सरासरी मालमत्ता 30 कोटींपेक्षा जास्त आहे. जवळजवळ 105 उमेदवारांची मालमत्ता एक कोटींच्यावर आहे. त्यामुळे उमेदवारांच्या संपत्तीचे हे आकडे पाहिल्यावर निवडणूक हा सर्वसामान्य माणसाचा खेळ राहिलेला नाहीच हेच स्पष्ट होतं.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x