सगळ्यात स्वस्त Private Jet Plane; संपूर्ण कुटुंबाला करू शकता जगभरात प्रवास

Cheapest Private Jet Plane : सगळ्यात स्वस्त आहे Private Jet Plane; संपूर्ण कुटुंबासोबत करू शकता जगभरात सुखद प्रवास 

दिक्षा पाटील | Updated: Jan 25, 2025, 06:27 PM IST
सगळ्यात स्वस्त Private Jet Plane; संपूर्ण कुटुंबाला करू शकता जगभरात प्रवास title=
(Photo Credit : Social Media)

Cheapest Private Jet Plane : देशात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथून लोकं प्रायव्हेट जेटनं प्रवास करतात. त्याची किंमत सगळ्यात जास्त असते. पण त्यातही असे काही लोकं आहेत, ज्यांच्याकडे वेळ नसतो आणि त्यामुळे प्रायव्हेट जेट प्लेन खरेदी करतात. पण असे देखील काही जेट प्लॅन्स आहेत जे खूप स्वस्त असतात. या जेट प्लेनन्समध्ये 5-7 लोक बसतील इतकी जागा असते. इतकंच नाही तर त्याचा आकार देखील छोटा असतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका जेट प्लेन विषयी सांगणार आहोत. जे व्हेरी लाइट जेट कॅटेगरीमध्ये येतात. 

Cirrus Vision Jet SF50
हा जेट मोठ्या प्रायव्हेट जेट्सच्या तुलनेत अर्ध्या किंवा त्याहून कमी किंमतीत उपलब्ध आहेत. या जेट प्लेनची किंमत जवळपास 3 मिलियन डॉलर अर्थात 25 -30 कोटीत हा प्लेन आहे. या जेटची सीटिंग कपॅसिटी ही 5-7 लोकांची आहे. हा जगातील सगळ्यात स्वस्त प्रायव्हेट जेट समजला जातो. यात मॉडर्न टेक्नोलॉजी, सिंपल ऑपरेशन आणि स्वस्तात मेन्टेनन्स आहे. 

HondaJet Elite
या जेटची किंमत 5 मिलियन म्हणजेच 40 कोटी रुपये आहे. तर या जेटची सीटिंग कपॅसिटी गी जवळपास 6-7 लोकांची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची फ्यूल एफिशिएंसी आणि आरामदायक इंटेरियर्स आहेत. 

Eclipse 500
सगळ्यात स्वस्त अर्थात इतर जेट्सच्या तुलनेत कमी किंमतीत असलेल्या या जेटची किंमत 2.5 मिलियन म्हणजेच 20 कोटी आहे. या जेटमधली सीटिंग कपॅसिट ही 4-6 लोकांची आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे जेट वजनानं हल्क आणि स्पीड चांगली त्याशिवा कमी इंथन वापरणारा आहे.  

हे जेट्स त्या लोकांसाठी योग्य आहेत जे छोट्या ग्रुप्समध्ये प्रवास करतात. त्याशिवाय त्यांना स्वस्तात किंमा कमी किंमतीत प्रवास करण्यासाठी पर्याय शोधत आहेत. Cirrus Vision Jet ला नेहमीच साइज आणि किंमतीमुळे स्वस्त लग्झरी टॅग लावण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लोकांना सतत प्रवास करावा लागतो आणि ते जेट खरेदी करू शकतात. त्यांनी हे ऑप्शन निवडण्यास हरकत नाही आहे. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)