पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडणार होती. पण पोलिसांना एक निनावी फोन आला, आणि पुढचा अनर्थ टळला. पिंपरी-चिंचवडमधील बालविवाह पोलिसांनी रोखला.
पिंपरी-चिंचवडमधल्या हिंजवडी-माण रस्त्यावरच्या शिवपार्वती मंगल कार्यालयात एक बाल विवाह होणार असल्याची माहीती पोलिसांना एका निनावी फोनवरुन मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कार्यालयाच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून मुलीचा जन्मदाखला मागविला. त्यावेळी बाब उघड झाली.
त्यानंतर दोन्ही बाजूंकडील लोकांनी मुलगी लहान असल्याचं मान्य करत लग्न थांबवलं. त्यामुळे पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र, नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांकडून पुन्हा बालविवाह होणार नाही, असा लेखी जबाब घेतला.
बालविवाह होऊ नयेत यासाठी हिंजवडी पोलिसांनी सर्व मंगल कार्यालयांना नोटीसा बजावल्या आणि मंगलकार्यालयांना मुला-मुलींचे जन्मदाखले घेण बंधनकारक केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.