एक नरभक्षक बिबट्या जेरबंद पण...

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मागील काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्यांची दहशत पसरली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती  आहे. या परिसरात काही शस्त्रधारी वनकर्मचारी तैनात करण्यात आल्याने डिंगोरे गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. 

Updated: May 8, 2015, 08:22 PM IST
एक नरभक्षक बिबट्या जेरबंद पण... title=

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मागील काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्यांची दहशत पसरली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती  आहे. या परिसरात काही शस्त्रधारी वनकर्मचारी तैनात करण्यात आल्याने डिंगोरे गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. 

जुन्नर तालुक्यातल्या डिंगोरे गावात सध्या दहशतीचं वातावरण आहे. ही दहशत आहे बिबट्याची. या प्ररिसरात वनविभागाच्या वतीने ८ पिंजरे लावण्यात आले आलेत. एक मादी जेरबंद करण्यात यश आले असले तरी ग्रामथांमधे भीती आहे.

या परिसरात अजून ५ ते ६ बिबटे असावेत, असा वनविभागाचा अंदाज आहे. त्यामुळं दिवसभर कडाक्याचं ऊन आणि रात्री बिबट्याची दहशत अशा कात्रित नागरिक जीव मुठीत घेऊन जगतायत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.