मुख्याध्यापिकेसह सहा महिला शिक्षकांवर लैंगिक अत्याचार

अकोल्यातल्या 'इकरा उर्दू हायस्कूल'च्या संस्थाचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Updated: May 8, 2015, 06:33 PM IST
मुख्याध्यापिकेसह सहा महिला शिक्षकांवर लैंगिक अत्याचार title=

अकोला : अकोल्यातल्या 'इकरा उर्दू हायस्कूल'च्या संस्थाचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मोहम्मद जाकीर मोहम्मद कासम असं या संस्थाचालकाचं नाव आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेसह इतर 6 महिला शिक्षिकांनी पोलिसांत लैंगिक आणि मानसिक छळ होत असल्याची तक्रार केलीये. 

अकोल्यातल्या जुने शहर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संस्थाचालक मोहम्मद जाकीर याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणातील आरोपी संस्थाचालक फरार आहे.    

अकोला शहरातील हमजा प्लॉट भागात 'इकरा उर्दू हायस्कूल' ही पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण देणारी शाळा आहे. मोहम्मद जाकीर मोहम्मद कासम हा संस्थेचा सचिव असून तोच संस्थाचालक म्हणून या शाळेचे काम पाहतो. मोहम्मद जाकीर याने गेल्या सहा महिन्यांपासून शाळेतील सात महिला शिक्षिकांची लैंगिक आणि मानसिक छळवणूक सुरु केल्याचा आरोप या शिक्षिकांनी केला आहे.
 
अखेर या महिला शिक्षकांच्या सहनशिलतेचा बांध फुटत त्यांनी या प्रकरणाची थेट पोलिसांत तक्रार केली आहे. त्यांनी संस्थाचालक मोहम्मद जाकीर याने गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.