राष्ट्रवादीचे नगरसेवक संपर्कात - एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत, असं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. 

Updated: May 7, 2015, 10:09 PM IST
राष्ट्रवादीचे नगरसेवक संपर्कात - एकनाथ शिंदे title=

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत, असं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. 

यासोबतच शिंदे यांनी, शिवसेना शेवटपर्यंत नवी मुंबईच्या महापौर पदासाठी प्रयत्न करणार असल्याच यांनी स्पष्ट केलंय.

यामुळे ९ मे रोजी होत असलेल्या महापौर निवडणुकीसाठी फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील विजयी नागरसेवकांचा सत्कार सोहळा पार पडला, त्यावेळी शिंदे बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.