मुंबई : अनुसुचित जाती जमातीमध्ये समावेश व्हावा, यासाठी धनगर समाजाचे सध्या आंदोलन सुरु आहे. त्याचवेळी आदिवासी समाजाकडून या मागणीला तीव्र विरोध होतोय.
याच प्रश्नी आदिवासी समाजानं नंदुरबारमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीला घेराव घालून निषेध केला. यावेळी आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
धनगर आरक्षणामुळे आदिवासींच्या आरक्षणाला धक्का पोहचणार असल्याचा दावा आंदोलकांनी केलाय. आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनीही यापूर्वीच धनगर आरक्षणाला विरोध केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.