दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 6 ठार, 22 जखमी

उस्मानाबादमध्ये बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक झालीय. त्यात 4 जण ठार झालेत तर 15 जण जखमी झालेत. 

Updated: Jul 28, 2014, 03:31 PM IST
दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 6 ठार, 22 जखमी title=

उस्मानाबाद/मुरबाड: उस्मानाबादमध्ये बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक झालीय. त्यात 4 जण ठार झालेत तर 15 जण जखमी झालेत. 

लातूर-बार्शी रोडवर पळसप फाट्याजवळ हा अपघात झालाय. जखमींना लातूर जिल्ह्यातील मुरुडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. 
 
तर दुसरीकडे मुरबाड-कल्याण-नगर महामार्गावर अपघात झालाय. कंटेनर आणि जीपची समोरासमोर धडक होऊन त्यात 2 जण जागीच ठार झालेत, तर 7 जण गंभीर जखमी आहेत. मुरबाडजवळच्या शिवळे गावाजवळ हा अपघात झालाय. अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी कंटेनर पेटवला. तसंच गावकऱ्यांनी कल्याण-नगर महामार्ग रोखून धरला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.