नागपूर: याकूब मेमनच्या फाशीनंतर नागपूरचे सीताबर्डी परिसरात स्फोट घडवू असा धमकीवजा फोन परवा रात्री २ वाजता अमरावती पोलीस कंट्रोल रुमला आला होता. तेव्हापासून नागपूर पोलीस गोपनीय पद्धतीनं शोध मोहीम राबवून होते.
काल रात्री या प्रकरणात नागपूर पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव शाहरुख आहे.
पोलीस संशयिताची कसून चौकशी करत असून हा फोन म्हणजे सत्य आहे की टवाळखोरी याचा तपास सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.