रेश्मा भोसले आणि भाजपला हायकोर्टाचा दणका

पुणे महापालिकेच्या भाजप उमेदवार रेश्मा भोसले यांना आणि पुणे शहर भाजपला मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका मिळालाय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 8, 2017, 06:57 PM IST
 रेश्मा भोसले आणि भाजपला हायकोर्टाचा दणका  title=

पुणे : पुणे महापालिकेच्या भाजप उमेदवार रेश्मा भोसले यांना आणि पुणे शहर भाजपला मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका मिळालाय. 

रेश्मा भोसले यांच्या भाजपतर्फेच्या उमेदवारीला उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय. त्यामुळे रेश्मा भोसले यांना आता अपक्ष लढावं लागणार आहे. रेश्मा भोसलेंनी राष्ट्रवादीचं तिकीट नं मिळाल्यानं अर्ज भरण्याच्या अखेरच्या काही तासांत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

त्यानंतर भाजपनं त्यांना AB फॉर्म दिला. त्याविरोधात काँग्रेस उमेदवार दत्ता बहिरट यांनी निवडणूक अधिका-यांकडे दाद मागितली. मात्र निवडणूक अधिका-यांनी रेश्मा भोसलेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला होता. 

निवडणूक अधिका-यांच्या त्या निर्णयाला दत्ता बहिरट यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर सुनावणी करताना, न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिलीय.