जळगाव : मोबाईल बॅटरी रिचार्ज करतांना बॅटरीचा स्फोट होऊन तरूणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील तळवेल गावात ही घटना घडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या तरूणाचा डोळा थोडक्यात वाचला आहे.
तरूणाने एक उपदव्याप केला, चार्जरच्या वायरवरील आवरण काढून बॅटरी चार्ज होत नाही, म्हणून वायर थेट बॅटरीला लावून, वायर गुंडाळून ठेवली.
यानंतर तासाभरात मोबाईल चार्ज झाला किंवा नाही हे पाहतांना या बॅटरीचा स्फोट होऊन डोळ्याला गंभीर दुखापत झाली. सध्या या तरूणाला एका डोळ्यातून दिसत नाहीय, पण सूज उतरल्यावर दिसेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या तरूणाच्या डाव्या डोळ्याच्या बुबुळाला जखम झाली आहे, पापणीचे केस जळाले असून, डोळ्यात कार्बन कण जमा झाले आहेत. खेकडा चार्जर प्रमाणे बॅटरी चार्ज करण्याचं तंत्र या तरूणाच्या जीवावर बेतलं आहे. या तरूणाची दृष्टी सुधारण्यास आठवडा लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.