ठाण्यात पोलीस हवालदाराची आत्महत्या

ठाण्यात एका पोलीस हवालदारानं आत्महत्या केलीय. अनंत सावंत असं या पोलीस हवादाराचं नाव असून त्यांनी राहत्या घरी स्वताला जाळून घेतलंय. मृत पोलीस हवालदार मुंबई नायगाव मुख्यालयात कार्यरत होते.

Updated: Oct 15, 2015, 10:52 PM IST
ठाण्यात पोलीस हवालदाराची आत्महत्या title=

ठाणे : ठाण्यात एका पोलीस हवालदारानं आत्महत्या केलीय. अनंत सावंत असं या पोलीस हवादाराचं नाव असून त्यांनी राहत्या घरी स्वताला जाळून घेतलंय. मृत पोलीस हवालदार मुंबई नायगाव मुख्यालयात कार्यरत होते.

ठाण्यातील कोपरी भागातील प्राची इमारतमध्ये त्यांनी स्वत:ला जाळून घेतलंय. विशेष म्हणजे त्यांच्या सेवेची केवल दीडच वर्ष बाकी असताना त्यांनी हे पाऊल उचललंय.

दिवंगत सावंत गेले ६ महीने आजारी होते आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र खासगीरुग्णालयातील रिपोर्ट ग्राह्य धरण्यास वरिष्ठांनी नकार दिला आणि सरकारी रुग्णालयातून रिपोर्ट आणायला सांगितले. यामुळे खचलेल्या सावंत यांनी नैराश्येपोटी आत्महत्येचे पाऊल उचलले. अनंत सावंत यांच्यामागे पत्नी आणि दोन मुली आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.