निखील चौकर, अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेत पक्ष विरोधात काम करण्यात आल्याने पक्षाने निलंबित केलेले नगरसेवक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
आपण पक्षातच असल्याचा दावा करत मनसेचे काही पदाधिकारी राज ठाकरे यांची भेट होऊ देत नसल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केलाय. जर नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पाठींबा दिलेला चालतो तर मग नगरमध्ये का नाही,असा सवालही त्यांनी केलाय.
सेनेचा वाईट अनुभव असल्याचे सांगत माणुसकी म्हणून तरी राज ठाकरे आमचे ऐकतील,अशी अपेक्षा निलंबितझालेल्या नगर सेवकांनी व्यक्त केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.